Samruddhi Highway Crane Collapses Sarkarnama
मुंबई

Samruddhi Mahamarg Crane Collapse: समृध्दी महामार्गावर क्रेन कोसळून १७ कामगारांचा मृत्यू

सरकारनामा ब्यूरो

Shahapur Accident News: मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून १७ कामगारांचा यात मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना पुलावरील क्रेन गर्डरसह कोसळली. अजूनही चार ते पाच कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काल ( सोमवारी) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारात हा अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरु आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. मृत कामगार हे परराज्यातील असल्याचे समजते. मृतांमध्ये काही इंजिनिअर असल्याची माहिती आहे.

पुलाचे गर्डर जोडणारी ही क्रेन साधारण 200 फूट लांबीची आहे. दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर शहापूर तहसीलदार, माजी आमदार पांडुरंग बरोरा घटनास्थळी पोहोचले.

या ठिकाणी गर्डर बसविण्याचे काम रात्री सुरू होते, काम सुरू असतानाच हा अपघात झाला, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली. ते घटनास्थळावरुन बोलत होते. या ठिकाणी एकूण १७ व नऊ इंजिनिअर काम करत होते. त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन गंभीर जखमी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT