Gujarat Elections Bjp Manifesto
Gujarat Elections Bjp Manifesto  sarkarnama
मुंबई

Gujarat Elections 2022 : विद्यार्थिनींना स्कुटी, ज्येष्ठ महिलांना मोफत बस प्रवास ; भाजपचा जाहीरनामा

सरकारनामा ब्युरो

Gujarat Elections Bjp Manifesto : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक आश्वासन भाजपने गुजरातच्या जनतेला दिले आहेत. विद्यार्थिनींना इलेक्ट्रिक स्कुटी, 20 लाख तरुणांना रोजगार, 2 एम्स स्तरावरील संस्थांची स्थापना आणि 10 लाखांचा आरोग्य विमा, ज्येष्ठ महिलांना मोफत बस यांच्यासह अनेक मोठी आश्वासने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.

भाजपने मतदारांना डोळ्यासमोर ठेवून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला असल्याचे दिसते. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शनिवारी गांधीनगर येथील प्रदेश कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

"संविधान हा आपला सर्वात मोठा धर्म आहे, त्याचं पालन करणं आणि ते सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत ‘सिंचन योजना’ पुढं नेण्यासाठी आम्ही 25 हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यासह आम्ही दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये 2 सी फूड पार्क उभारणार आहोत," असेही नड्डांनी जाहीर केले.

जे.पी.नड्डा म्हणाले, "भाजप सरकार जे सांगतं तेच करते. आम्ही संविधानाचे पालन करत असतो. आमच्या या संकल्प पत्राने गुजरातचा नक्की विकास होईल,गुजरात ही संतांची भूमी आहे," जाहीरनाम्यात ४० महत्त्वाची आश्वासने दिली आहेत.

3 सिव्हिल मेडिसिटी, 2 एम्स स्तरावरील संस्था, विद्यमान रुग्णालये, सीएचसी आणि पीएचसीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा महाराजा श्री भागवत सिंह स्वास्थ्य कोष तयार केला जाणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

  1. आयुष्मान भारत योजनेंतर्गत 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आता 10 लाख करण्यात येणार आहे.

  2. सत्तेत आल्यानंतर गुजरात राज्यात समान नागरी कायदा लागू केला जाईल.

  3. पुढील 5 वर्षात गुजरातमधील तरुणांना 20 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

  4. 10,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 20,000 सरकारी शाळांचं रूपांतर उत्कृष्ट शाळांमध्ये केलं जाईल.

  5. मुलीना पदव्युत्तरपर्यंत मोफत आणि दर्जेदार शिक्षण, गुणवान मुलांना दुचाकी.

  6. महिला ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास, पाच वर्षांत महिलांना १ लाख रोजगार, २० हजार सरकारी शाळांचा अमुलाग्र बदल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT