Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

Ashish Shelar : आशिष शेलार, आता सांगा राजकीय संन्यास कधी घेणार?

Maharashtra Lok Sabha Results : कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी राजकीय नेते वेवेगवेगळ्या प्रकारची विधाने करत असतात. भाजप नेते आशिष शेलार यांनीही काही दिवसांपूर्वी असेच विधान केले होते, ते आता त्यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे.

अय्यूब कादरी

Pune News : आशिष शेलारसाहेब, आपण राजकीय आता संन्यास घेतल्याची घोषणा कधी करणार, असा प्रश्न आज सायंकाळपर्यंत त्यांना नक्कीच विचारला जाऊ शकतो, कारण हे संकट त्यांनी स्वतःट ओढवून घेतले आहे. लोकसभा निव़़णुकीत महाविकास आघाडीच्या 18 जागा निवडून आल्या तर मी राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. महाविकास आघाडीच्या 18 पेक्षा जास्त जागा निवडून येत आहेत, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त झाला होता, तो खरा ठरताना दिसून येत आहे.

महाविकास आघाडीला महायुतीकडून सातत्याने कमी लेखले गेले, खिल्ली उडवण्यात आली. काही नेत्यांनी तर सातत्याने पातळी सोडून वक्तव्ये केली. अशी वक्तव्ये करण्यासाठीच त्यांची खास नेमणूक करण्यात आली होती की काय, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला होता. आशिष शेलार यांचाही उत्साह वाढला होता. त्यांना कार्यकर्त्यांमध्ये जोश भरायचा होता. त्यातून त्यांनी असे वक्तव्य केले होते. महाविकास आघाडीची मोठी पडझड झाली होती, खरेतर चौकशी यंत्रणांचा ससेमिरा मागे लावून भाजपनेच ती पडझड केली होती. त्यामुळे शेलार यांचा उत्साह आणखी वाढणे साहजिक होते.

राज्यातीन लोकसभेच्या 45 हून जास्ता जागा जिंकण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून हे आव्हान पेलता येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना वाटले होते. मात्र ते प्रत्यक्षात उतरताना दिसत नसल्याचे मतमोजणी सुरू झाल्यानंतर समोर आले. त्यामुळे आशिष शेलार यांची अडचण झाली आहे. आज सायंकाळ होता होता विरोधक राजकीय संन्यास कधी घेणार, असा प्रश्न आशिष शेलार यांना नक्कीच विचारणार

भाजपच्या ४५ जागा निवडून येणार नाहीत, याचा भाजप नेत्यांना आधीच आला होता, असे शेलार यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले होते. महाविकास आघाडी 18 जागा जिंकू शकते, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. भाजप आणि मित्रपक्षांचे 30 खासदार निवडून येतील, असेच शेलार यांनी खात्रीने सांगितले होते. महाविकास आघाडीचे १८ पेक्षा अधिक खासदार निवडून आले तर राजकीय संन्यास घेईन, असे त्याला जोडूनच शेलार बोलले होते. एका मराठी दैनिकाला  दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गणित मांडले होते. संन्यास घेण्याचे ओपन चॅलेंज आता शेलार यांना भलतेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT