Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray: मुंबईतील रस्त्यांच्या कामात 263 कोटींचा मोठा घोटाळा; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : सत्तासंघर्षाच्या निकाल कधीही लागू शकतो, असं असतानाच आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होत. मात्र, या भेटीनंतर खुद्द आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. मुंबईतील रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, "माझ्याबरोबर अनिल देसाई आणि अनिल परब आहेत. त्यामुळे काहींना वाटेल की काही वेगळी चर्चा झाली. पण असं काही नाही. गेल्या सहा ते सात महिन्यात मुंबई महापालिकेत मोठा भष्ट्राचार झाला आहे. यामध्ये रस्त्याच्या कामात मेगा घोटाळा झाला आहे. खडीच्या प्रकरणात देखील मोठा भष्ट्राचार झाला आहे. मुंबईतील कथित घोटाळ्याप्रकरणी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली", असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

"जानेवारीमध्ये टेंडर निघाले. तेव्हा सांगण्यात आलं की 900 रस्ते, म्हणजे 400 किलोमीटरचे रस्ते मुंबईत काँक्रीटचे होतील. या सर्व रस्त्यामधील 10 पण रस्ते झाले नाहीत. याबाबत आम्ही प्रशासकाला पत्र दिले पण याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही. मुंबईत खडीचा मोठा घोटाळा झाला आहे, तो मी आपल्या सर्वांच्या समोर आणला. असं म्हटलं जातं की सीएमच्या जवळचे कोणीतरी या संपूर्ण रॅकेटमध्ये आहेत", असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

"एका कंपनीमुळे मुंबईतील काम तीन आठवडे बंद होती. गोखले ब्रीज काम असेल, डिलाय रोडचं काम असेल, ही सगळी कामं मे अखेरपर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. पण तसं झालं नाही. 300 रुपये प्रति टन वरून सुमारे 600 रुपये प्रति टन एवढी किंमत वाढलेली आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रीट फर्नीचरचा घोटाळा जो आहे, एकाच कॉन्ट्रॅक्टरसाठी साधारणपणे 160 कोटीची कामं ही 263 कोटीला दिलेली आहेत", असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तसेच या घोटाळ्याची संपूर्ण माहिती आम्ही राज्यपालांना दिलेली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT