Vasai Virar Municipal Corporation .jpg 
मुंबई

Vasai Virar News : वसई विरार महापालिकेतच राहणार २९ गावे; न्यायालयाने याचिका फेटाळल्या

सरकारनामा ब्यूरो

संदीप पंडित-

Marathi News : वसई विरार महानगरपालिकेतून गावे वगळण्यासाठी गेली १३ वर्षे येथील नागरिक आंदोलन करत होते. गावे पालिकेतून वगळावीत, यासाठी करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. आता २९ गावे वसई विरार महापालिकेत राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

नव्या निर्णयाने शासनाने मागविलेल्या हरकती आणि सूचना १४ फेब्रुवारीच्या अधिसूचनेने मागविल्या आहेत. असे असले तरी गावे वगळल्याचा जल्लोष कॉंग्रेसतर्फे वसईमधील काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष अनिल आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे.

वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर त्यात ४ नगरपालिका आणि ५५ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. परंतु ५५ ग्रामपंचायतींमधून २९ गावे वगळण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी ३१ मे २०११ ला २९ गावे महापालिकेतून वगळण्याचा अध्यादेश काढला होता. शासनाच्या निर्णयाविरोधात पालिकेने याचिका करून विरोध दर्शविला होता. त्यावर स्थगिती मिळविली होती.

दरम्यानच्या काळात गावे वगळण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली होती. त्याची शासनाने दखल घेतली नव्हती. परंतु १४ फेब्रुवारीला २०११ चा शासन निर्णय रद्द करत नव्याने काढलेल्या अध्यादेशात गावे पालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना काढली होती. त्यामुळे आता शासनाची अधिसूचना कायम राहिली असून, पालिकेत गावे राहणार असल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अखेर गेली १३ वर्षे जो लढा आम्ही लढत होतो, त्याला यशाला आहे. शासनाने काढलेली अधिसूचना बेकायदेशीर असून, त्या विरोधात शासनाकडे आम्ही दाद मागणार आहोत, असे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी सांगितले.

शासनाने काढलेली अधिसूचना बेकायदेशीर आहे. २९ गावे पालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना शासनाने काढली असली तरी त्याची अंमलबजावणी अजून सुरू केली नाही. त्या विरोधात आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ, असे जिमी घोन्साल्विस यांनी सांगितले.

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गावाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणला होता, परंतु भाजपने त्यावर बोळा फिरविला आहे. येणाऱ्या निवडणुकीत गावे पालिकेत समाविष्ट करण्याचे पाप भाजपला पराभवाचा धक्का देईल, असे शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद खानोलकर यांनी सांगितले.

R

SCROLL FOR NEXT