Sharad Pawar-Eknath shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : '' पाच महिन्यांत ३९१ शेतकरी आत्महत्या, ३ हजार १५२ महिला बेपत्ता...; शरद पवारांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा हिशोबच मांडला

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : '' सत्ता बदलते, येते जाते याची दखल सत्ताधारी पक्षानं घेतली पाहिजे. पण सध्या राज्यात शेतकरी अस्वस्थ आहे, दुखावला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जाती धर्मात तेढ निर्माण केली जात असून अनेक ठिकाणी दंगलीच्या घटना घडल्या आहेत. तसेच पाच महिन्यांत ३९१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तसेच जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ३१५२ महिला, मुली बेपत्ता झाल्या आहेत. यावरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत सरकार गंभीर नसल्याचं पाहायला मिळत आहे'' अशा कठोर शब्दात टीकेचा आसूड ओढतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षाचा हिशोबच मांडला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हाँल येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, राज्यात जाती धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काळजी राज्यकर्ते घेत असतात. पण आजकाल परिस्थिती वेगळी आहे. राज्यात अनेक ठिकाणी दंगलीच्या घटना घडताहेत. महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य म्हणून ओळखले जात होतं. पण आता अनेक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत असल्याचा ठपकाही शरद पवारां(Sharad Pawar) नी यावेळी ठेवला.

तसेच लहानातल्या लहान घटक, महिलां(Women) च्या सुरक्षिततेची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. पण आता राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी चिंताजनक आहे. आणि जातीधर्मात तेढ निर्माण करुन त्याचा फायदा राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न सध्या सत्ताधारी पक्षाकडून सुरु असल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

सत्ताधारी पक्षाने सरकारमधील महत्वाच्या पदांची प्रतिष्ठा ही ठेवली पाहिजे. राष्ट्रपती, सरन्यायाधीश यांच्यासारख्या कुठल्याही महत्वाच्यापदांची प्रतिष्ठा राखली पाहिजे असंही मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन हे पंतप्रधान मोदींनी केलं. पण हे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते का करण्यात आलं यापाठीमागचं कारण पवारांनी उलगडून सांगितलं.

पवार म्हणाले, जर राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात केलं असतं तर मोदींचं नाव चर्चेत राहिलं नसतं. आणि मोदीं(Narendra Modi) चं नाव चर्चेत राहावं या एकाच कारणासाठी राष्ट्रपतींना संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित न करण्यात आले नाही व त्यांच्याहस्ते उद्घाटन केलं गेलं नाही. कुठल्याही महत्वाच्या पदांची प्रतिष्ठा राखायची नाही हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता असल्याची घणाघाती टीका पवार यांनी मोदी सरकारवर केली.

म्हणूनच देशातील मोदी सरकारविरोधात आम्ही विरोधी पक्षांची एकजूट करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रत्येक कार्यकर्ता हा देशातील परिस्थिती ही एकसंध राहील कशी याचा काळजी घेत आहे. तसं वातावरण निर्माण करत आहे. देशातील लोकशाहीवर विश्वास असलेल्या पक्षांना एकत्रित आणण्यासाठी पाटण्यात जमत आहोत. देशातील लोकशाही, संविधानावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींच्या हातात परत सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी पक्षाने पुढाकार घेतला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT