NCP Leaders Meeting | Prafula Patel
NCP Leaders Meeting | Prafula Patel Sarkarnama
मुंबई

NCP Leaders Meeting : राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचा मोठा निर्णय; पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावे...

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar Retirement : 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात येत असल्याचा ठराव पारित करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (A big decision by the executive of NCP; Pawar should continue as President...)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे, पण त्यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला. पक्षाच्या निवड समितीच्या बैठकीतील सदस्यांनी ठराव मंजूर केला. त्यामुळं भविष्यातही शरद पवार हेच एकमेव नेते असणार आहेत. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी बैठकीत पारित केलेल्या ठरावाबाबत सांगितले.

''दोन तारखेला पवार साहेबांनी जो निर्णय घेतला. तो आम्हाला विश्वासात न घेता घेतला. आम्हाला त्यांच्या या निर्णयाची अजिबात कल्पना नव्हती. नव्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांनी जी समिती नेमली होती. त्या समितीची आज बैठक पार पडली. त्यानंतर आजच्या समितीच्या बैठकीत एक ठराव पारित केला आहे. हा ठराव आम्ही शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचं,'' त्यांनी सांगितलं.

''राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अदध्यभपदाचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या राजीनामा एकमाने नामंजूर करण्यात येत आहेत. पण समितीतील सदस्यांच्या एकमतानुसार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावं, असा ठराव मंजूर करण्यात येत आहे. तसेच, त्यांनी देशातील कोट्यावधी लोकांच्या इच्छेसाठी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा.'' असा ठराव मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

गेल्या २ मे ला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादीच्या अध्यक्षाची जबाबदारी कोणावर सोपवावी यासाठी एक समिती गठीत केली. त्यात माझं नाव पहिलं होतं. यात त्यांनी ती जबाबदारी मला दिली. त्यानुसार आजच्या बैठकीत आम्ही सर्वानुमते एक ठराव मंजूर केला आहे. (Sharad Pawar Resign news Update)

जे काही सभागृहात झालं ते तुम्ही पाहिलं. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती ते असा निर्णय जाहीर करतील. असही पटेल यांनी यावेळी सांगितलं. सगळ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमानंतरही माझ्यासारखे पक्षाच्या अनेकांच्या ज्येष्ठ नेत्यांनी भेट घेतली. शरद पवार साहेबांची आज संपुर्ण देशाला, राज्याला आणि पक्षाला गरज आहे. या पक्षाचं नाव आणि आधारस्तंभ तुम्हीच आहात. अशा भावना कार्यकर्ते, नेत्यांनी व्यक्त केल्या.

आज राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशासाठी शरद पवार हे सन्मानित नेते आहेत. पंजाबचे शेतकऱ्यांनीही त्यांनी केलेल्या कामाची पावती दिली. शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम पंजाब कधीही विसरु शकत नाही. अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांनी हे पद सोडू नये, अशी नेत्यांचीच नव्हे तर कार्यकर्त्यांचीही भावना आहे. जिथे जिथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, त्यांच्या मनात दुखद भावना असल्याचंही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT