Ministers Aslam Shaikh & Varsha Gaikwad  Sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडीचे आणखी २ मंत्री अडचणीत; अस्लम शेख, वर्षा गायकवाडांवर गुन्हा दाखल

Mahavikas aaghadi | Congress : मोहित कंबोजांचे यांनी महिन्याभरातच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणली तिच वेळ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी २ मंत्री अडचणीत आले आहेत. एका जाहिर कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) आणि मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांनी एका कार्यक्रमात तलवार पकडल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

या प्रकरणावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी मंत्री अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांचे फोटो ट्विट करत काही खोचक सवाल केले होते. तलवार दाखवल्याबद्दल माझ्यावर शस्त्रास्त्र कायद्यअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता मला पहायचे आहे की या काँग्रेस नेत्यांविरुद्ध पोलिस गुन्हा नोंदवतील का? मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना विनंती करतो की त्यांनी निष्पक्ष कारवाई करावी अन्यथा तुम्ही देखील इतरांसारखेच आहात, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली होती.

काही दिवासांपूर्वी नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभर जल्लोष केला होता. हा जल्लोष करताना भाजप नेते मोहीत कंबोज यांनीही कार्यकर्त्य्यांसह जल्लोष साजरा केला. त्यावेळी त्यांनी तलवार दाखवली होती. त्यानंतर मुंबई पोलिस मोहीत कंबोज यांच्या घरी पोहोचले होते, त्यावरूनच काँग्रेस नेत्यांनाही तोच न्याय लागू होणार का? असा सवाल त्यांनी केला होता. याबाबत बोलताना कार्यक्रमात शीख समाजाने परंपरेप्रमाणे तलवार दिली. अशा तलवारी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही दिली आहे. पण आम्ही तलवार घेऊन लोकांमध्ये नाचलो नाही, दहशत नाही पसरवली, हा फरक आहे. असे प्रत्युत्तर शेख यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT