Anand Paranjpe, CM Eknath Shinde
Anand Paranjpe, CM Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणं भोवणार, आनंद परांजपेंवर अटकेची टांगती तलवार

सरकारनामा ब्यूरो

Ncp Leader Anand Parajpe News : माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरणं त्यांना भोवणार असल्याचं दिसत आहे. परांजपे यांच्याविरोधात कल्याण डोंबिवलीतील विविध चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. (Ncp Leader Anand Parajpe Latest News )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यानं शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) चांगलीच आक्रमक झाली आहे. शिंगे गटाकडून . कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात आनंद परांजपे (Anand Parajpe) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तकारीनुसार आता परांजपे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

"आपल्या राज्याची वाटचाल आता...जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या NC आता FIR मध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. व त्या Cognisable Offence मध्ये घेतल्या आहेत. आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली.

आपल्या राज्याची वाटचाल आता पोलिसी राज्याकडे होऊ लागली की काय? असा सवाल उपस्थित करतानाच परांजपे यांना अटक कराच असा इशाराही आपल्या ट्विटमधून आव्हाड यांनी दिला आहे.

आनंद परांजपे नेमकं काय म्हणाले होते?

माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी '' मुख्यमंत्री, ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे असं वक्तव्य आनंद परांजपे यांनी केलं होत. तसेच. ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गु्न्हे दाखल केले ते खरे गुन्हेगार आहेत अशी टीका करतानाच आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या. कोणाची बदनामी त्यातून केली नाही असंही स्पष्टपणे सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT