Eknath Shinde, Ravindra Chavan Sarkarnama
मुंबई

Ravindra Chavan News : भाजप-शिंदे गटात वादाचा भडका उडाला असतानाच मंत्री रवींद्र चव्हाणांचं 'कल्याण'बाबत मोठं विधान, म्हणाले...

Kalyan Dombivali Politics : राज्यातील महायुती सरकारमध्ये शिंदे व फडणवीस यांचे मनोमिलन असले तरी...

Deepak Kulkarni

Kalyan Dombivali News : कल्याण डोंबिवली मतदारसंघाकडे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते. पण आता या मतदारसंघावर भाजपनेही आपली चांगली पकड मिळवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे दोनवेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचवेळी कल्याण डोंबिवली मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही नेटवर्क भक्कम आहे. त्याचाच दरवेळी फायदा भाजपला होतो. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपने चांगली पकड मिळवली आहे.

पण महायुतीमध्ये निवडणूक लढवताना हा मतदारसंघ शिवसेनेकडे जात असल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले जात आहेत. पण आता भाजप नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

कल्याण पूर्वेत भाजप आणि शिवसेना शिंदे समर्थक यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये शिंदे व फडणवीस यांचे मनोमिलन असले तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र शिंदे व भाजप कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने खटके उडाले जात आहेत. कल्याण डोंबिवलीतील भाजप आणि शिवसेना शिंदे समर्थक यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहे.

याचवेळी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात दौरे, बैठका, भेटीगाठी, मेळावे यांचा धडाका लावला आहे. यामुळे एकीकडे भाजपचा मुख्यमंत्र्यांच्या चिंरजीवांच्या मतदारसंघावर डोळा आहे की काय अशी शंका घेतली जात असतानाच आता भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीविषयी सूचक वक्तव्य केले आहे.

भाजप नेते, मंत्री रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यांनी यावेळी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ आणि महापालिकेबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील. 45 पेक्षा जास्त खासदार कसे निवडून आणता येतील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये कुठेतरी विरजण घालण्याचं काम काहीजण करतायत असा गंभीर आरोप केला आहे.

तसेच मला खात्री आहे, कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून खासदार होतील असेही चव्हाण म्हणाले. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यात सध्या शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील असेही त्यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदे मूळचे ठाण्याचे आहेत. आता शिवसेनेत दोन गट आहेत, एक शिंदे गट आणि ठाकरे गट. शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे. एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यात मोठी ताकद आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघावरही त्यांची पकड आहे. याच कल्याण लोकसभा मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) लोकसभेवर निवडून गेले आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजपात अंतर्गत धुसफूस वाढली होती. काही कुरबुरी होत्या. पण आता अंतर्गत स्पर्धा नाहीय, श्रीकांत शिंदेच खासदार होतील असं सांगून रवींद्र चव्हाण कल्याण -डोंबिवली मतदारसंघातील भाजप शिंदे गटातील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे

शिंदे त्या दिलेल्या शब्दाला जागतील...

भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागच्या निवडणुकीतच भाजपला महापौरपद देण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत महापौरपद कोणाकडे किती काळ, याबाबत ठरविण्यात आले होते, मात्र, शेवटच्या टप्प्यात गडबड झाली, असा दावा केला.

महापौर भाजपचाच झाला पाहिजे असे मला वाटतं, पण मातोश्रीवरून गडबड होत आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. आता आपल्याला संधी आहे. कारण निर्णय शिंदे घेणार आहेत. ते शब्दाला जागतील. त्यामुळे महापौर आपलाच होणार, यात कोणतीच शंका नसून कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT