Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis
Vidhan Bhavan Mumbai, Maharashtra Political Crisis  Sarkarnama
मुंबई

Breaking! विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे निधन

सरकारनामा ब्युरो

मुंबई : साताऱ्यातील कांदळगावचे रहिवासी शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी विधानभवनाबाहेर आत्महदनाचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. ते ४५ वर्षांचे होते.

२३ ऑगस्ट रोजी ते विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यतिथ झालेल्या देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये मोठी चकमक झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट धारेवर धरलं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच त्याला सर्व मदत केली, जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT