Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray on BMC: मुंबई महापालिकेवर एक जुलैला भव्य मोर्चा काढणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुंबई महानगरपालिकेवर येत्या 1 जुलैला शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे नेते आणि आदित्य ठाकरे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेना भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मुंबई महापालिकेच्या ठेवी अर्थात जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्यावतीने 1 जुलैला भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आज शिवसेना भवनमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काही कानमंत्रही दिल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेवर येत्या एक जुलैला भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अर्धवटराव असा केला होता. त्यानंतर आता त्यांच्या टिकेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर देत "मी अर्धवटराव, तर ते काय आवडाबाई आहेत का?", असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT