Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंच्या दिमतीला नवीन 'थापा'; महिन्यापासून सावलीसारखा ठाकरेंच्या पाठीशी...

Shivena political : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर थापा यांनी ठाकरेंसोबत राहण्याऐवजी शिंदे गटाची वाट धरली.

सरकारनामा ब्यूरो

गणेश कोरे -

Mumbai News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि चंपासिंग थापा य़ांचं अतुट नातं होतं. मात्र,इमानेइतबारे सेवा थापा यांनी शेवटच्याक्षणापर्यत बाळासाहेबांची सेवा केली. मात्र, शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर थापा यांनी ठाकरेंसोबत राहण्याऐवजी शिंदे गटाची वाट धरली. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र,आता उध्दव ठाकरेंच्या सेवेसाठी मातोश्रीवर नवीन थापा दाखल झाला आहे.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना फिजीओथेरपी सुरू होती. तर सध्या देखील त्यांना विविध व्यायाम करावे लागतात. तर सध्या आता ठाकरे यांचे राज्यभर दौरे सुरू झाले असून प्रत्येक दौऱ्यात थापा त्यांची सावली म्हणुन वावरत आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्य अधिवेशन, मालेगाव व नुकतीच झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या सभेत देखील थापा उद्धव ठाकरे यांच्या मागे सावलीसारखा वावरताना दिसला.

मुंबईचे नगरसेवक किम बहादूर थापा यांनी बाळासाहेबांच्या सेवेसाठी चंपासिंग थापा यांना नेपाळवरून आणले होते. गेली अनेकवर्षे चंपासिंग थापा यांनी बाळासाहेबांची सेवा केली. प्रत्येक दौऱ्यांमध्ये चंपासिंग थापा बाळासाहेबांची औषधे, प्रत्येक कार्यक्रमात त्यांना काय पाहिजे काय नको आदी सर्व सेवा करताना बाळासाहेब ठाकरेंची सावली झाली होते. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर थापा शिंदे गटात दाखल झाले. यामुळे मोठी चर्चा देखील झाली होती.

ठाकरेंसोबत थापासह आणखी कोण ?

उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासगी सुरक्षारक्षक रजपूत, रविंद्र म्हात्रे आणि खासगी सचिव मिलिंद नार्वेकर असतात. आता यांच्यासोबत थापा हा काळजीवाहक म्हणून दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत वावरणाऱ्या थापाच्या खांद्याला नेहमी एक पिशवी असते. या पिशवीत काही औषधं असल्याची बोललं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT