Mumbai News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एसआयटीच्या पथकाकडून अंकशास्त्रज्ञ खरातची कसून चौकशी सुरू आहे. राज्यातील बडे नेते, मंत्री, आणि सनदी अधिकारीही या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकल्याचं समोर आलं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यातच आता माजी मंत्री व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पण त्यांनी यावेळी आपला टीकेचा पहिला वार थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी(ता.23 मार्च) राज्यात सध्या लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांनी खळबळ उडवून दिलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर सडेतोड भाष्य केलं. यावेळी त्यांनी भोंदू बाबा तर आहेतच, पण भोंदू भक्त आणि भोंदू मंत्र्यांवरही कारवाई केली पाहिजे,अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, असे सगळे लोक सोबत घेऊन कारभार चालणार आहे का? उपमुख्यमंत्री वा कुणीही असोत, ज्यांचे ज्यांचे फोटो या प्रकरणात आले आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कॅप्टन फाईलमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे,असंही त्यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरेंनी यावेळी अशोक खरात प्रकरण आणि सातारा फाईल कुठून बाहेर येतात हे माहिती नसल्याचं सांगत एक वेगळीच शंका उपस्थित केली. तसेच त्यांनी अशोक खरात प्रकरणातील ते फोटो कुणी बाहेर काढलेत आणि कशासाठी काढलेत याचाही तपास व्हावा, अशी मागणीही केली.मात्र,या खरात प्रकरणामध्ये कुणावर कारवाई होणार याकडे आमचं लक्ष आहे, असंही ते म्हणाले.
आमदार आदित्य ठाकरेंनी यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या राड्यावरूनही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, सरकारमध्ये मिंधेंच्या मंत्र्यांची किंमत काय हे समोर आलं आहे. त्यांच्या गटातील सगळे डरपोक असून भाजपकडून फाईली दाखवल्यावर ते शांत बसतात, असा आरोपही ठाकरेंनी केला.
ते म्हणाले, ते याचसाठी गुवाहाटीला गेले होते.पण आता या सरकारमध्ये मिंधेंच्या मंत्र्यांची इज्जत काय आहे हे समोर आलं आहे. कुणीही येतो आणि कुणाच्याही निलंबनाची मागणी करतोय, असा घणाघातही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.