Aaditya Thackeray News :  Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray News : मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले,"...तर लोकसभा निवडणुकही लढवेन!"

Deepak Kulkarni

Mumbai News : ठाकरे घराण्यातील थेट जनतेतून निवडणूक लढवून ती जिंकण्याचा मान आदित्य ठाकरेंना २०१९ च्या विधानसभेला मिळाला. वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.यानंतर आमदार झाल्यावर त्यांची महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर आघाडी सरकार कोसळले. तेव्हापासून त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री शिंदेंविरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करत त्यांना जाहीर आव्हान देत आहेत. याचवेळी आता आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती समोर येत आहे.

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे.या कार्यक्रमात त्यांनी भाजपसह शिंदे गटाच्या बंडखोरीवरही भाष्य केलं. ठाकरे म्हणाले,मला पक्ष जी निवडणूक लढविण्यास सांगेल ती निवडणूक मी लढवेन. मला जी जबाबदारी मिळेल ती मी निभावण्यासाठी तयार असेन.पक्षाला प्रत्येक माणसाची गरज असते. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्ष जी जबाबदारी सोपवतो, त्यासाठी तयार असतो असेही ते म्हणाले.(Loksabha Election)

ठाकरे म्हणाले, जे आपल्यासोबत आहेत तेच आपले आहेत. त्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे.इंडिया आघाडीत अनेक पक्ष असे आहेत,जे आमच्याबाबत काही वेगळा विचार करायचे किंवा आम्ही त्यांच्याबाबत काही वेगळा विचार करायचो.पण आता देशासाठी,राज्यांसाठी ते एकत्र येत असतील तर त्यांना घेऊन पुढे जाऊ अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.

या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी(Aaditya Thackeray) अनेक धक्कादायक खुलासे केले. एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडावर ते म्हणाले, तुम्ही विचार करा,एका व्यक्तीच्या मनात किती काळं असू शकतं.ज्या व्यक्तीने तुम्हाला मोठं केलं,तो रुग्णालयात आहे आणि तुम्ही स्वतः करिअरबद्दल विचार करत आहे.जेव्हा त्यांना विचारलं,तेव्हा ते रडायला लागले.आणि म्हणाले, नाही...नाही...हे असं आहे.तुरुंगात टाकतील.हे तुरुंगात जायचं वय नाहीये. मुलाला तुरुंगात टाकतील. असं करतील,तसं करतील.त्यानंतर २० जून रोजी ते पळून गेले.

पळून गेलेल्या ४० लोकांना त्यांनी जे खाल्लं ते पचवता आलं नाही किंवा लपवता आलं नाही याची भीती वाटत होती. म्हणूनच ते पळून गेले.जे प्रामाणिक होते,धाडसी होते,ते आमच्यासोबत राहिले. महाराष्ट्रात राहिले.बाकीचे गुजरात,गुवाहाटी आणि गोव्यात पळून गेले असा हल्लाबोलही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT