Manish Sisodiya Arrest
Manish Sisodiya Arrest Sarkarnama
मुंबई

Manish Sisodiya Arrest : सिसोदीयांच्या अटकेनंतर 'आप' आक्रमक; दिल्ली - मुंबईत आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी (दि.27 फेब्रुवारी) अटक केली. तब्बल आठ तास चौकशी केल्यांनतर सीबीआयने त्यांना अटक केली. मात्र, त्यांच्या अटकेनंतर दिल्लीसह महाराष्ट्रात 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मुंबईत आम आदमी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनादरम्यान 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनावेळी पोलिसांमध्ये आणि 'आप' कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

मनीष सिसोदिया यांना जाणूनबुजून अटक करण्यात आल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान काही 'आप'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्ली, मुंबईनंतर पुण्यातही 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली.''मनीष सिसोदिया हे निर्दोष असून जनता याचे उत्तर देईल. यामुळे आमचा संघर्ष आणखी मजबूत होईल'' , असं केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर आता त्यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT