Abdul Sattar Sarkarnama
मुंबई

राज्य महिला आयोग अॅक्शन मोडवर; सत्तारांच्या अडचणी वाढणार

Abdul Sattar| अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Abdul sattar| मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी गलिच्छ भाषेत वक्तव्य केल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून सत्तारांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत.

''राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा,'' असे ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

तसेच, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काढलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते. त्यांच हे वक्तव्य म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा आणि कर्तव्यहनन करणार आहे. त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या आणि त्याचे अहवाल सादर करण्याचे सुचना दिल्या असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कुठे सरकारची गाडी रुळावर चालत असतांना सरकारमधील काही मंत्री आणि आमदार अनावश्यक वादग्रस्त वक्तव्यं आणि वादग्रस्त कृत्य करून विरोधकांच्या हाती आयतचं कोलीत देत आहेत.

यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शिंदे-फडणवीसांची नाहक डोकेदुखी वाढवत आहेत. यावरून अनेकदा मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळातील मंत्री आणि सत्ताधारी आमदारांना समज दिली होती. मात्र तरी देखील मंत्री, आमदारांचं ये रे माझ्या मागल्या, असचं वागणं सुरू आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदेंचा आपल्या मंत्र्यांवरील आणि आमदारांवर कंट्रोल सुटत चाललायं का?, असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT