Abdul Sattar Sarkarnama
मुंबई

Abdul Sattar : गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ फिरवणारे सत्तार नाराज ? ; सत्तार म्हणाले..

Abdul Sattar : गुवाहाटी का गेलो नाही, याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

Abdul Sattar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांसह आज (शनिवारी) पुन्हा गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात काही आमदार, मंत्री गेले नाहीत, ते नाराज असल्याची चर्चा आहे. (Abdul Sattar latest news)

अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, तानाजी सावंत हे आज गुवाहाटी दौऱ्यावर गेले नाहीत. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणेदेखील गुवाहाटीला गेले नाहीत. शिंदे गटातील काही आमदार मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने नाराज आहेत. त्यामुळे ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले नसल्याचे समजते.

गुवाहाटी का गेलो नाही, याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे गटातील नाराजीची चर्चा सुरू होताच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

"शिंदे सरकारवर मी नाराज नाही. 1 डिसेंबरला सिल्लोडमध्ये कृषी प्रदर्शन आहे. त्यासाठी आज अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आहे. या प्रदर्शनाच्या तयारीसाठीच मी सिल्लोडला थांबलो आहे. त्यामुळेच आज कामाख्यादेवीच्या दर्शनासाठी जाऊ शकलो नाही," असे सत्तार यांनी माध्यमांना सांगितले.

मुख्यमंत्र्याचा गुवाहाटी दौरा यापूर्वी 21 नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र,सर्वांच्या सोयीसाठी ही तारीख बदलून 26 नोव्हेंबर करण्यात आली. त्यानंतरही काही आमदार पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण सांगून गुवाहाटीला गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT