Shambhuraj Desai,Abdul Sattar,  Deepak Kesarkar, Sanjay Rathore
Shambhuraj Desai,Abdul Sattar, Deepak Kesarkar, Sanjay Rathore Sarkarnama
मुंबई

अब्दुल सत्तार, संजय राठोड आक्रमक होताच शिंदे नरमले; कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)-देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमधील मंत्र्यांचा राजभवन येथे शपथविधी सुरू असून आतापर्यंत भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली आहे. शिंदे गटाकडून प्रथम शपथ घेण्याचा मान गुलाबराव पाटील यांना संधी मिळाली आहे. या वेळी १८ मंत्र्यांना शपथ देण्यात येणार असून हे सर्व कॅबिनेट मंत्री असणार आहेत. यामध्ये अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. (Abdul Sattar, Shambhuraj Desai, Deepak Kesarkar Lottery of Cabinet Ministers)

दरम्यान, मंत्रीपदाच्या यादीत नाव लक्षात येताच अब्दुल सत्तार, संजय राठोड प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरमले आणि त्यांनी या दोघांची नावे मंत्रीपदाच्या यादीत समाविष्ठ केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सह्‌याद्री अतिथिगृहावर मोठा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा आदी १८ जणांचा समावेश आहे.

minister List

विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांचे नाव मंत्रीपदासाठी नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यापालांना गेलेल्या १८ जणांच्या यादीत सत्तार यांचे नाव आहे, त्यामुळे त्यांचे मंत्री पदनिश्चित आहे. आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेतली आहे.

minister List

मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस यांना टीकेचे धनी व्हावे लागत होते. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर घूमजाव करण्यात आले होते. तसेच, राज्याच्या काही भागात होत असलेली अतिवृष्टी पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पालकमंत्रीच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांनी दिल्लीवरून आल्यानंतर आज सकाळी नंदनवन बंगल्यावर एक बैठक घेतली होती. त्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे ठरविले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT