Abdul Sattar| Uddhav Thackeray|
Abdul Sattar| Uddhav Thackeray| 
मुंबई

गद्दारीचे उत्तर देणार; अब्दुल सत्तारांचे ठाकरेंना खुले आव्हान

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेसह राज्यभरातून गद्दारी असल्याची टीका होत आहे. अशात रविवारी (२४ जुलै) शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांच्यावर टीका केली. "जे गेले त्यांचे कोणत्या भाषेत वर्णन करायचे, काल त्यांनी आम्हाला गद्दार बोलू नका, अशी विनंती केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर शिक्का मारुन घेतला आहे,'' अशी टीका करत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

त्यांच्या या टीकेला आता बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला सांगितला तर मी उद्या राजीनामा देतो आणि पहिल्या निवडणूकीत किती मतांनी निवडूण येतो हे त्यांना दाखवणार. गद्दारीचंच उत्तर मी त्यांना देणार आहे, जे बोललो ते करुन दाखवणार. ३१ जुलै ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या मराठवाड्यात येणार आहेत, जिल्ह्यातील लाखो लोक त्यांची वाट पाहत आहे, असही त्यांनी म्हटलं आहे.

आमच्या मराठवाड्यात शिंदेंचा आमदार पडणार नाही. याची गॅरंटी देतो. मी बेचाळीस वर्षांपासून राजकारणात आहे. पंचवीस वर्षांपासून आमदार आहे. मी पाचवेळा आमदार झालो, तीनवेळा मंत्री झालो पण ते एकदाच मुख्यमंत्री झालेत, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. माझ्या मतदार संघात आदित्य ठाकरे आले नाहीत. माझ्याकडून त्यांना आमंत्रण आहे की त्यांनी माझ्यासारख्या गद्दाराच्या मतदार संघात यावं, असं आव्हान सत्तार यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवंगत बाळासाहेबांचे अनुयायी आहेत. पण त्यांच्याच निष्ठेवर त्यांना शंका आहे. त्यांच्या युतीपुर्वी आमची भाजपसोबत युती होती. आता आम्ही जे करत आहोत ते युतीचे कर्तव्य पार पाडत आहोत. आम्हीच युतीधर्म पाळत आहोत आणि हेच सत्य आहे. एकीकडे आमदारांना बदनाम करायचं आणि दूसरीकडे मातोश्रीचे दरवाजे खुले असल्याचं सांगायंच हे राजकारण नसतं. राजकारणात हा सूर्य हा जयद्रथ, हे राजकारणात दाखवाव लागतं आणि आम्ही ते दाखवणार आहोत. सत्य बोलाव लागतं आणि सत्य बोलण्यासाठी तुम्ही माझ्या मतदार संघात या आणि सत्यता तपासून घ्या. एकनाथ शिंदे ३१ तारखेला आमच्या औरंगाबादमध्ये येणार आहे. तेव्हा लोक कसं उत्तर देतात, हे तुम्हाला दिसेल, असे खुले आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT