Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या! राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल…

Maharashtra Police : महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या हातात 48 तास द्या आणि महाराष्ट्र साफ करायला सांगा, असं राज ठाकरे म्हणाले होते.

Rajanand More

Mumbai News : आधी उल्हासनगर आणि काल दहिसरमध्ये गोळीबाराच्या गंभीर घटना घडल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून या घटनेशी निगडित कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, त्यांच्या मुलाखतीतला एक जुना व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल झाला आहे. (Raj Thackeray News)

मनसेने (MNS) ट्विटरवरून राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला आहे. एका मुलाखतीत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल राज ठाकरे बोलत होते. ते बोलत असताना त्यांनी महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) आणि मुंबई पोलिसांवर विश्वास आहे, असं वक्तव्य केलं आहे.

‘आपल्या देशात कायदे आहेत, फक्त ऑर्डर नाहीत. ऑर्डरची गरज आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या हातात 48 तास द्या आणि महाराष्ट्र साफ करायला सांगा. सगळ्या गोष्टी पोलिसांना ठाऊक असतात. फक्त ऑर्डर नसतात. रिस्क कोण घेईल’, असं विधान ठाकरेंनी या मुलाखतीत केलं होतं.

पोलिसांनी एखादी भूमिका स्वतःहून घेतली की त्यांना जेलमध्ये जावं लागेल. का जातील ते जेलमध्ये? बसलेला माणूस टेम्पररी आहे. त्याच्यासाठी यांनी का कायमचं जेलमध्ये जावं? फक्त त्यांना 48 तासांचा मोकळा हात द्या, अशी मुलाखत त्यांनी दिली होती. मनसैनिकांकडून हा व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल केला जात आहे.

सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याची विरोधकांना आयती संधी

उल्हासनगर आणि त्यानंतर दहिसरमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, या सगळ्या प्रकरणामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांची बदनामी करण्याची माहिती संधी मिळाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

घडलेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात आहेत. आता त्यांना आयती संधी हातात चालून आली आहे. त्यामुळे ते ही संधी कशी सोडतील, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT