Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar Case : मॉरिस चार दिवसांपूर्वीच 'वर्षा' बंगल्यावर होता, मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटोही समोर!

Shiv Sena Uddhav Thackeray Group Leader Abhishek Ghosalkar Shot in Mumbai : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण काय?

सरकारनामा ब्यूरो

Abhishek Ghosalkar Shot Dead :

मुंबईतील दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नारोन्हा यानेही स्वतः गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने राजकीय क्षेत्र हादरले आहे. या घटनेनंतर काही वेळातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा माॅरिस नारोन्हा हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. माॅरिस याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय) आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!, असे ट्विटमध्ये म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊत यांनी या ट्विटसोबत मॉरिसचा मुख्यमंत्र्यांना भेटताना फोटोही पोस्ट केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात पुन्हा राजकीय द्वंद्व पेटले आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र रोज गुंड टोळ्यांना भेटतात. पक्षात प्रवेश देतात, तर गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नाही. पोलिस आता शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकरांची हत्या धक्कादायक असल्याचे संजय राऊत म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT