Raj Thackeray, Abu Azmi on Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

राजकारण तापले! राज ठाकरेंना बेड्या ठोकण्याची अबू आझमींची मागणी

Ajan|Raj Thackeray| Abu Azmi| राज ठाकरे यांच्या मशिदीवरच्या भोंग्याबाबत केलेल्या विधानावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (RajThackeray) यांनी मशिदींवरीर भोग्यांबाबत केलेले विधानानंतर राजकारण अधिकच चिघळत चालल्याचे दिसत आहे. एकीकडे मनसेचे मुस्लिम पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या या विधानाने दुखावले असून एकापाठोपाठ एक राजीनामा देत आहेत. तर दूसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी थेट राज ठाकरेंना बेड्या ठोकण्याचीच मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. (Abu Azmi on Raj Thackeray)

''असे लोक ज्यांची काही लायकी नाही, ज्याच्याकडे कोणतेही पद नाही, असे राज ठाकरे यांच्यासारखे लोक मनमानी करुन मशिदींना परवानगी असतानाही, कायद्यानुसार काम होत असतानाही मशिदींवरील भोंग्याना विरोध करत आहेत. या देशात प्रत्येक हिंदूला मंदिरात प्रार्थना करण्याचे आणि मुसलमान व्यक्तीला मशिदींमध्ये नमाज पठण करण्याचे स्वातंत्र्य असतानाही राज ठाकरेंसारखे लोक उठसुट काहीही बोलत आहेत, अशी खंत अबू आझमी यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज ठाकरे यांना यांच्या या वक्तव्याविरोधात बेड्या ठोकून तुरुंगात टाकण्याची मागणीही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या मशिदीवरच्या भोंगावर केलेल्या विधानावर पुण्यात मनसेमध्ये (mns) दुफळी निर्माण झाली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. तीन दिवसात तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मोरेंना शहराध्यक्षपदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. अद्यापर्यंत तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसे शाखाअध्यक्ष माजीद शेख, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी, शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे.

''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, असे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं आहे. त्याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत. काल मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबर यांची ही नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT