मुंबई : शिवसेनेचे नेते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. परब यांनी वांद्रे पूर्वेकडील गांधीनगर येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ मधील मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले होते. त्याप्रमाणे झालेल्या सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले आहेत. पण या आदेशाला आता न्यायालयाने तात्पुरते संरक्षण दिले आहे. बांधकाम तोडण्यास स्थगिती दिल्याचे म्हाडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनिल परब यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कार्यालयावर कारवाईचे नियोजन केले होते ; मात्र कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सोसायटीने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने संबंधित बांधकाम १४ ऑक्टोबरपर्यंत तोडण्यास स्थगिती दिली आहे. यामुळे या कार्यालयाला तात्पुरते संरक्षण मिळाले आहे.
आदेशानुसार म्हाडा या बांधकामावर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कार्यालयावर कारवाईचे नियोजन होते; परंतु परब यांनी हे अनधिकृत कार्यालय माझ्या नावे नसल्याचे पत्र म्हाडाला दिले आहे. यातच आता या बांधकामावर कारवाई करू नये, यासाठी या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सोसायटीने शहर दिवाणी न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्यायालयाने संबंधित बांधकामावर १४ ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे तूर्तास तरी या कार्यालयाला संरक्षण मिळाले आहे.
परब यांचे वांद्रे पूर्व कार्यालय जमीनदोस्त करण्याची तयारी ‘म्हाडा’कडून MHADA सुरू आहे. त्याचबरोबर याच परिसरात असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे NCP office कार्यालय पाडण्यासाठी 'म्हाडा'ने नोटीस पाठविली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचे निवासस्थान असलेल्या आणि शिवसेनेच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात या कारवाईमुळे राजकीय युद्ध रंगण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.