Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar: शरद पवार यांच्या पदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे गहिवरले...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा करत आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. तसेच जितेंद्र आव्हाड यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी सर्वच नेत्यांनी शरद पवार यांना त्यांचा हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली.

यावेळी धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाया पडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "देशातील अनेक संकटांना आपण वाचवलं. आता देशावर संकट असताना आपला हा निर्णय आम्हाला हा पटलेला नाही. मी सर्वांच्यावतीने विनंती करतो की आपण हा निर्णय माघे घ्यावा", असं म्हणताना धनंजय मुंडे यांना गहिवरून आलं.

तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी तुम्हीच आमचे नेते, अध्यक्षपदावरून निवृत्त होऊ नका, अशी विंनती करत हा निर्णय मागे घेण्याची भावनिक साद त्यांनी यावेळी घातली.

दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताच कार्यकर्ते भावनिक झाले. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्ते त्यांना साकडे घालत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT