Shivsena Thane  Sarkarnama
मुंबई

Shivsena : ठाण्यात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे-ठाकरे गटात राडा

Thane News : शाखा ताब्यात घेण्यावरुन हा वाद पेटला, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

सरकारनामा ब्यूरो

शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात अनेक ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा ठाण्यातील शिवाई नगरमध्ये शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे.

ठाण्यात दोन्ही गटाचे शिवसैनिक आमने-सामने आल्यामुळे शिवाई नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्यावरून इतर शाखांमध्ये देखील असा प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आता काळजी घेण्यात येत आहे. तर शिवसेनेच्या शाखावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ''शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा काहीही संबंध नाही. इथं आमच्या शिवसेनेची लोकं बसून कामं करतात. कायदा आम्हालाही कळतो'', अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT