Narayan Rane News Sarkarnama
मुंबई

नारायण राणेंच्या विरोधात मनसे-शिवसेना-शिंदे गट एकत्र

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी २००५ मध्ये शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

सरकारनामा ब्यूरो

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी २००५ मध्ये शिवसेनेला (Shivsena) जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राणे यांच्यासोबत १० आमदारांनी शिवसेना सोडली होती. शिवसेनेला राणे यांनी मोठा धक्का दिला होता. त्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली होती. त्यावेळी राणे विरोधात आंदोलन केल्यामुळे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाल झाले होते.

त्या गुन्ह्यासंदर्भात आता न्यायालयात सुनावणी सुरु आहे. राणे यांच्या विरोधात आंदोलन झाले होते. तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही शिवसेनेतच होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तेव्हा शिवसेनेचे आमदार होते. त्यामुळे आज तीन पक्षांत विभागलेली शिवसेना तेव्हा राणेंच्या विरोधात लढत होती.

राणेंच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. त्यातील अनेक शिवसैनिक नेते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बाळासाहेबांची शिवसेना (म्हणजे शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या वेगवेगळ्या पक्षात विभागले गेले आहेत. मात्र, मुंबई सत्र न्यायालयातील खटल्यासाठी सर्वजन एकत्र आले.

या संदर्भात बोलताना शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab) म्हणाले, जे आरोपी असतात, ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना सगळ्यांना एकत्र यावेच लागते. अशी हजारो प्रकरणे आपण राजकारणात बघितली आहेत. १६ नोव्हेंबरनंतर हा खटला सुरु होईल, असेही परब यांनी सांगितले. या खटल्याच्या संदर्भाने नवे-जुने शिवसैनिक पुन्हा एकत्र आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT