IAS Ashwini Bhide Latest News, Actor Sumeet Raghvan News Sarkarnama
मुंबई

अश्विनी भिडे पुन्हा मेट्रोत येताच सुमीत राघवन झाला भलताच खूश!

अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिंदे सरकारची सत्ता येताच आरे मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा तापला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेच कारशेड होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्याला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. आता ठाकरे सरकारने उलचबांगडी केलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे नव्या सरकारने मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा दिला आहे. त्यावर अभिनेता सुमीत राघवन भलताच खूश झाला आहे. (Actor Sumeet Raghvan News)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना भिडे यांच्याकडेच मेट्रोचा (Metro Project) कारभार होता. त्यानंतर ठाकरे सरकारने आरेतील कारशेडचा मुद्दा तापल्यानंतर भिडे यांची बदली केली होती. आता पुन्हा एकदा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आला आहे. सध्या भिडे या मुंबई पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयुक्त आहेत. (Ashwini Bhide in Metro Project)

आरे कारशेडचा मुद्दा तडीस नेण्यासाठीच भिडे यांना त्याठिकाणी आणल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या काळात झालेल्या कामाचे अनेकांनी कौतुक केले होते. त्यामुळे त्या पुन्हा मेर्टोत आल्याने राघवन यालाही आनंद झाला आहे. याबाबतचे ट्विट करून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

भिडे यांच्याकडे मेट्रोची जबाबदारी दिल्याचा आदेश राघवन याने ट्विट केला आहे. 'येस, आता मजा येणार. या प्रकल्पाचा तार्किक शेवट व्हावा, असं मला नेहमी वाटायचं. ओजी ईज बॅक. हा खूपच चांगला निर्णय आहे,' असं म्हणत भिडे यांचे स्वागत केले आहे.

राघवन याने त्याआधी पर्यावरणवाद्यांवरही टीका करणारे ट्विट केले होते. मेट्रो कारशेड समर्थकही पर्यावरणाच्या विरोधात नाहीत. आता वेळा आली आहे जागं होण्याची. आंदोलनांनी नुसतं फलक हातात घेऊन झाडांना मिठ्या मारण्यापेक्षा पर्यावरणासाठी खिशातले पैसे खर्च करावेत. समाजाचं काहीतरी भलं करा, असा सल्ला राघवन याने दिला होता.

दरम्यान, मुंबई मेट्रो हा भाजपचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. सुरूवातीला या प्रकल्पाचा कार्यभार अश्विनी भिडे यांच्याकडे देण्यात आला होता. पण 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांची बदली करण्यात आली. आरे कारशेड हा मुद्दा त्यासाठी कारणीभूत ठरला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT