Gautam Adani News :
Gautam Adani News : 
मुंबई

Gautam Adani News : अदानींच्या भेटीनंतर राज ठाकरे थेट फडणवीसांच्या भेटीला ; चर्चांना उधाण

सरकारनामा ब्युरो

Gautam Adani News : उद्योगपती, अदानी समुहाचे (adani group) अध्यक्ष गौतम अदानी (gautam adani) यांनी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns president raj thackeray) यांची अदानी यांनी काल (मंगळवारी) बैठक घेतली. त्यांची जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी अदानी यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. गौतम अदानी आणि राज ठाकरे यांच्या या भेटीत धारावी पुनर्विकासविषयी चर्चा झाली, अशी माहिती मिळाली आहे.

गौतम अदानी यांच्या भेटीनंतर काही वेळातच राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. या सर्व गाठी-भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वरदहस्त असल्यामुळेच उद्योगपती गौतम अदानी यांनी मागील काही काळात उद्योगविश्वात मोठी प्रगती केली आहे, असा आरोप अदानीवर नेहमी करण्यात येतो. पण अदानी यांना कुठल्याही पक्षाचे वावडे नसल्याने अशा भेटींमुळे दिसते. सत्ता कुणाचीही असो अदानी हे त्यांच्याशी संवाद साधत असतात. पण अदानी यांच्यावर मोदींचा वरदहस्त अशल्याची टीका होती.

त्यावर अदानी यांनी नुकतेच भाष्य केलं आहे. गुजरातमधील आपल्या व्यवसाय वाढीबाबत अदानींनी सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची किती जवळीक आहे? त्यांचे यश आणि मोदी यांचा संबंध काय? याबाबत अदानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अदानी यांच्यावर होते असलेल्या आरोपावर त्यांनी खुलासा केला आहे.

ते म्हणाले, "उद्योगाला प्रोत्साहन देणारं गुजरात सरकार आहे. गुजरात सरकारने आमच्यासाठी काही विशेष केलं असं नाही. पंतप्रधान मोदींसोबतच्या संबंधांवर टीका करणारे हे सोयीनं विसरतात की माझा प्रवास जवळपास चार दशकांपूर्वीच सुरू झाला आहे"

"राज्य सरकार कुणाचेही असो मला कोणतीही अडचण येत नाही.ममता दीदींच्या पश्चिम बंगालमध्ये, नवीन पटनायकजींच्या ओडिशामध्ये, जगनमोहन रेड्डींच्या राज्यात आणि अगदी केसीआरच्या राज्यातही आम्ही काम करत आहोत. फक्त भाजपाशासित राज्यांमध्येच आमचा व्यवसाय आहे असं नाही"," असे सांगत गौतम अदानी यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT