Aditya Thackeray :
Aditya Thackeray :  Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, जेलमध्ये जाण्याच्या भितीने..

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray's Biggest Secret Blast : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतल्या बंडानंतर सर्वात मोठे गौप्यस्फोट समोर आले आहे. जेलमध्ये जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे भाजपमध्ये गेल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजममध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असे शिंदे म्हणाले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

"एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे ही आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी या सर्वात मोठ्या गौप्यस्फोटाचा खुलासा केला आहे.

आदित्य म्हणाले, "हे चाळीस लोक स्वत:च्या जागासाठी आणि पैशासाठी गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्याघरी येऊन, माझ्यासमोर रडत होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणांकडून अटक करण्यात येणार होते. त्यांनी त्या वेळी सांगितलं की, मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT