Aditya Thackeray & ajit pawar in Worli Mumbai  sarkarnama
मुंबई

'पुढे चला मुंबई' ; अजितदादांनी केलं आदित्य ठाकरेचं कैातुक, एकाच गाडीने प्रवास

पवार-ठाकरेंच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. आदित्य ठाकरे आणि अजित पवार एकाच गाडीने प्रवास करत असल्याचं दिसून आलं आहे. आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते.

Mangesh Mahale

मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख दोन नेते आज सकाळीच एकत्र पाहायला मिळाले. शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यासोबत आपल्या वरळी मतदार संघात विकास कामांची पाहणी केली.

अजितदादांनी आदित्य ठाकरेंचे यावेळी कैातुक केले. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेच्या हेरिटेज वॉकची सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं होतं.

मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी विकास कामाचा धडाका लावला आहे. 'पुढे चला मुंबई' अशी घोषणा त्यांनी केली आहे. पवार-ठाकरेंच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. आदित्य ठाकरे आणि अजित पवार एकाच गाडीने प्रवास करत असल्याचं दिसून आलं आहे. आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. (Aditya Thackeray & ajit pawar in Worli Mumbai)

महालक्ष्मी रेड क्रॉस, वरळी , धोबी तलावंची पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे. पुण्यात सकाळी विकास कामाची पाहणी अजित पवार नेहमीच करीत असतात. मुंबईत पहिल्यांदाच सकाळी अजित पवार यांनी विकास कामाची पाहणी केली.

काही महिन्यापूर्वी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. तेव्हा कृषी विज्ञान केंद्र पाहून झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अजित पवार ड्रायव्हिंगला बसलेल्या कारमध्ये बसले होते. तेव्हा, आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले होते. आज आदित्य ठाकरे गाडी चालवीत होते, त्यांच्या बाजूला अजित पवार बसलेले होते. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सारे काही आलबेल असल्याचे दिसते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यातील ट्युनिंग विधिमंडळात दिसून आलेलं आहे. मुंबई महापालिका भेटीत देखील अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आज मुंबईच्या रस्त्यावर हेच चित्र दिसते. राज्यातील सरकार पडणार असल्याच्या चर्चा वारंवार केल्या जातात मात्र आजचं चित्र पाहून त्यावर देखील पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT