Aditya Thackeray
Aditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

Aditya thackeray : मुंबई महानगरपालिकेत 'बिहारी' रणनीती : भाजप-मनसेच्या मैत्रीवर ठाकरेंचा करेक्ट उतारा!

Chetan Zadpe

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर आता महत्त्वपूर्ण माहिती हाती येत आहे. तेजस्वी यादव हे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारासाठी येणार आहेत. मुंबईतील बिहारी जनतेला साद घालून शिवसेनेच्या पाठीशी राहण्यासाठी यादव हे मुंबईतील बिहारी जनतेला आवाहन करतील.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य आणि तेजस्वी यादव यांची भेट झाली. यात प्रामुख्याने मुंबईच्या निवडणुकांवर चर्चा झाल्याचे समजते आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आगामी मुंबईची निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा कस लागणार आहे. या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पण मुंबईत वास्तव्यास असणारे मतदार मुंबई महानगरपालिकेत निर्णायक भूमिका ठरवतात. मुंबईत जवळपास या दोन्ही राज्यांमधील ५० लाख हिंदी भाषिक मतदार आहेत. ५० लाख मतं उमेदवार विजयी करण्यासाठी फारच निर्णायक ठरणारे असतात.

तेजस्वी यांच्या भेटीनंतर आदित्य यांनी हिंदी भाषिकांना साद घालणारं विधान केलं होतं. आदित्य म्हणाले, “हिंदी भाषिकांच्या आणि उत्तर भारतीयांच्या विरोधात ज्यांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यांच्याशीच आता भाजपाची जवळीक साधत आहे.” मनसे अध्यक्षांचा नाव न घेता, आदित्य यांनी टीका केली. यामुळे उत्तर भारतीयांचे विरोध करणारे भाजपचे मित्र तर, बिहारी नेते आपले मित्र, असं ठसवण्याचा आदित्य ठाकरे प्रयत्न करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT