Sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर झाले नतमस्तक... सभेची मने जिंकली

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) मैदानात जमलेल्या शिवसैनिकाच्या विराट गर्दीला पाहून भावूक होऊन नतमस्तक झाले.

अमित आवारी

मुंबई - मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मैदान ( बीकेसी ग्राऊंड ) येथे आज शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियानाची विराट सभा झाली.. या सभेत भाषणासाठी उभ्या राहिलेले शिवसेनेचे युवा नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) मैदानात जमलेल्या शिवसैनिकाच्या विराट गर्दीला पाहून भावूक होऊन नतमस्तक झाले. "मला तुमच्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माझ्या आजी दिसल्या" असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. आदित्य ठाकरेचे हे रुप पाहून शिवसैनिक भारावून गेले. ( Aditya Thackeray bowed before the Shiv Sainiks ... won the hearts of the rally)

सभेच्या सुरवातीला मंत्री गुलाबराव पाटील व एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना आदित्य ठाकरे व्यासपीठावर आले. शिंदेंच्या भाषणानंतर ते भाषण करण्यासाठी उभे राहिले. आदित्य ठाकरेंचे नाव घेताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. शिवसैनिकांच्या या प्रेमाने भावूक होत आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठाच्या समोरील बाजूस जाऊन गुडघे जमिनीवर टेकवत शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, नतमस्तक होताना मला तुमच्यात पंचमुखी हनुमान दिसले, मर्यादा पुरूषोत्तम राम, सीता, लक्ष्मण, महादेव दिसले, आपल्यात मला हिंदुह्रद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे व माझ्या आजी दिसल्या. आम्ही तुमच्या आशीर्वादाने सत्तेत बसलो. आम्ही काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेत दिलेल्या आशीर्वादाने आपले सरकार आले.

ते पुढे म्हणाले की, कोविडचे संकट आले तरी विकासकामांची गती महाविकास आघाडी सरकारने कमी होऊ दिली नाही. जगासमोर कोविड संकट असतानाही जगाला महाराष्ट्रानेच धारावी पॅटर्न दाखवून दिला. हा धारावी पॅटर्न दाखविणारा मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याचा अभिमान आहे. कोविड काळात महाराष्ट्रात झालेल्या कामांचे कौतुक जगाने केले आहे. कोविड काळातही राज्यातील शाश्वत विकास थांबला नाही. हे आपले संयमी व संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचे फळ आहे.

मी 31 वर्षांचा युवा म्हणून तुम्हाला विचारत आहे की, आपल्या देशात व राज्यात अनेक नागरी प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी आहे. समाजात भांडणे लावली जातात. अनेकांनी वेगवेगळे रंग हाती घेतले आहेत. आणि मग तुम्ही कोणती बाजू निवडणार आहात. तुम्ही घर पेटविणाऱ्यांच्या बाजूने आहात की चूल पेटविणाऱ्यांच्या बाजूने आहात. आपण चूल पेटविणारे लोक आहोत. ह्रद्यात राम व हाताला काम हे आपले ब्रिद वाक्य आहे. खरे हिंदुत्व तेच आहे की आम्ही जी वचने घेतो ती पूर्ण करून दाखवितो, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT