Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray News : 'पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला अन् त्यानंतर आता...' ; 'MNS'ला आदित्य ठाकरेंनी पुन्हा डिवचलं?

Aditya Thackeray on Sandeep Deshpande : 'माझ्या विरोधात मला वाटलं बायडनच लढत आहेत.' असं म्हणत संदीप देशपांडेंच्या वरळीतील उमेदवारीवरूनही टोला लगावला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray on Maharashtra Nivnirman Sena : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकारपरिषदेत बोलातना विविध मुद्य्यांवर प्रतिक्रिया दिली. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यावरूनही त्यांनी टोला लगावल्याचं दिसून आले.

आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) पत्रकार परिषदेत मनसेवर बोलताना म्हणाले, 'पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात. सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू. कोरोना काळ असेल किंवा मुंबईत चांगलं, वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होतो का?'.

तसेच, मनसेकडून वरळी मतदरासंघात संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे, यावरून टोला लगावताना आदित्य ठाकरे यांनी 'माझ्या विरोधात मला वाटलं बायडनच लढत आहेत.' असं म्हटलं.

याशिवाय बांग्लादेशातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी ' हा त्यांचा स्थानिक विषय जरी असला तरी आपल्या देशावर याचा परिणाम होऊ शकतो का? याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या बाजूचा हा देश आहे इमर्जिंग इकॉनोमी होती. डोमेस्टिक नाहीतर एक्स्टर्नल अफेअर्समध्ये आपल्याला काय होऊ शकतं का? आपल्याला परराष्ट्रमंत्री सांगतीलच.' अशी प्रतिक्रिया दिली.

ऑन प्रकाश आंबेडकर -

'प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांच्या बद्दल काही बोलणार नाही. आम्हाला जे उत्तर द्यायचं ते आम्ही लोकसभेत दिले आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले आहे त्याच्यासाठी लढत आहोत. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करून गद्दारांनी सरकार स्थापन केलं आहे.' असंही यावेळी आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवलं.

ऑन इलेक्शन कमिशन -

'इलेक्शन कमिशन हे एनटायरली कॉम्प्रोमाइज आहे . आम्ही जे करतो ते चुकीचा आहे आणि जे भाजप करतं ते सगळं बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी नाही अनेक नेत्यांनी सांगितलं इलेक्शन कमिशनचं खरं ऑफिस भाजपचं ऑफिस आहे.' अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT