Aditya Thackeray, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

वाचून का होईना मुख्यमंत्र्यांनी माहिती द्याला हवी होती; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना चिमटे

Aditya Thackeray News : टाटा एअर बस प्रकल्पावरून राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray News : टाटा एअर बस प्रकल्पावरून राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आरोपांना उत्तर दिले.

फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लक्ष्य केले. प्रकल्प राज्याबाहेर गेला, यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होते. त्यांनी वाचून का होईना, पण बोलायला पाहिजे होते, असा चिमटा आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आकडेवारीचा खेळ आम्ही करु शकत नाही. सरकामध्ये बसलेले लोक आकड्याच्या खेळ करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असे बोलत नव्हते. त्यांना चुकीची माहिती दिली जात असेल, असे आदित्य म्हणाले.

रायगडमध्ये २० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प येणार आहे. असे उपमुख्यमंत्री सांगितले. मात्र, हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकामध्ये ठारला आहे. दावोसमध्येच या संबंधिचा करार झाला असल्याचा दावा, आदित्य ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली, असा आरोप आदित्य यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT