Aditya Thakre Sarkarnama
मुंबई

वेदांता पाठोपाठ आणखी एक प्रकल्प राज्यातून बाहेर जाणार; आदित्य ठाकरेंचा गोप्यस्फोट

शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉननंतर आता 'मेडिसीन डिवाइस पार्क' हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याचा दावा शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधीपक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले होते. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते.

त्यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार आहे, असा दावा ठाकरे यांनी केला आहे. 'मेडिसीन डिवाइस पार्क' प्रकल्प राज्याबाहेर जाणार आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आदित्य यांनी ट्विट करत 'मेडिसीन डिवाइस पार्क' हा प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याचा दावा केला आहे. आदित्य यांनी शिवसेना (Shivsena) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्विट रिट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी डिसीन डिवाइस पार्क' प्रकल्पासाठी केंद्र सरकारशी केलेले पत्र व्यवहार ट्विट केले आहे. आदित्य ठाकरे यांनी चतुर्वेदी यांच्या पत्र व्यवाहाराचा हवाला देत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे'. 'उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?, असा सवाल ठाकरे यांनी शिंदे सरकारला केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT