Aditya Thackeray| Sandeep Deshpande|
Aditya Thackeray| Sandeep Deshpande| Sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरेंनी एकाच वाक्यात उत्तर देत संपवला मनसेचा विषय

सरकारनामा ब्युरो

मुंबईः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका घेतल्यानंतर राज्यात शिवसेना मनसे वाद शिगेला पोहचला आहे. शिवसेनेला डिवचण्यासाठी आज मनसेने (MNS) शिवसेना (Shivsena) भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालिसा ऐकवली. यानंतर पोलिसांनी भोंगा बंद करु काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं. या मुद्द्यावरुन मनसेने पुन्हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला लगावत मनसेवर पलटवार केला आहे.

''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल,'' असे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं होत. त्यानंतर मनसेनं मुंबईत हनुमान चालीसा लावण्यास सुरवात केली आहे, आज रामनवमीनिमित्त (ramnavami) मनसेने शिवसेना भवनासमोर (shiv sena bhawan) हनुमान चालिसा लावली.

आज सकाळी मनसेने शिवसेना भवनासमोर एका रथात भोंगा लावून हनुमान चालिसा लावला होता, शिवसेनेला डिवचण्यासाठी मनसेचा हा प्रयत्न आहे, त्यावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे. मनसेनं लावलेले भोंगे पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

यावर मनसेचे नेते संदिप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी पुन्हा शिवसेनेवर आगपाखड केली आहे. शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का? आज रामनवमी निमीत्त सेना भवनबाहेर जर हनुमान चालीसा चे पठाण केले तर यात अचानक काय आहे? शिवसेना भवन हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक पवित्र स्थान आहे. मग त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारला अडचण काय आहे? मस्जिद समोर हनुमान चालीसा लावली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मग शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का?, ठाकरे सरकार हे तालिबानी आहे का ? असा खोचक सवाल संदिप देशपांडे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT