Eknath Shinde, Aditya Thackeray Latest News sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : 'वेदांता' वरुन मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना दिले सडेतोड उत्तर

Eknath Shinde : कुठली इंडस्ट्री वाढवण्यासाठी कोणी किती आणि कुठं बैठका घेतल्या?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील उद्योग प्रकल्प परराज्यात जात असल्याची टीका विरोधक करीत आहेत, यावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) होणारा वेदांता हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे, यावरुन सध्या विरोधक-सत्ताधारी यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु होत आहेत.माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

'बल्क ड्रग पार्क'साठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणला होता. हा प्रकल्प देखील आपण रायगड आणि इतर परिसरात आणणार होतो. यासाठी हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी प्रस्ताव पाठवले होते. पण आता गुजरातमधील भरुच इथं हा 'बल्क ड्रग पार्क' होणार आहे. या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्रानं पहिल्यांदा केली होती. सप्टेंबरमध्ये हा प्रकार घडला होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.

"या काळात सध्याचे मुख्यमंत्री घरोघरी जाऊन भेटी देत होते, अनेक ठिकाणी फिरत होते. पण या मुख्यमंत्र्यांना आणि उद्योग मंत्र्यांना देखील हा विषय माहिती नसेल की, हा मोठा प्रोजेक्ट जो महाराष्ट्रासाठी उपयोगी होता त्यावर महाराष्ट्राचा पहिला हक्क होता, तो महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. हे किती खरं आणि किती खोटं याचं उत्तर मला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपेक्षित आहे," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

"मला याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी राजकराण केलं तर त्यांचेच मुखवटे फाटतील. याला जबाबदार तेच आहेत. कारण गेल्या अडीच वर्षामध्ये काय परिस्थिती होती. कोणाला कोण भेटत होत? काय करत होत ? कुठली इंडस्ट्री वाढवण्यासाठी कोणी किती आणि कुठं बैठका घेतल्या? असे अनेक सवाल उपस्थित करत हल्ली कुठे कोणी दौरे करुन काय होत नाही. प्रत्यक्ष काम करावं लागतं," असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना हाणला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT