Minister Aditya Thackeray  sarkarnama
मुंबई

ठाकरे सरकार केव्हाही गडगडणार, असे विचारताच आदित्य यांनी स्पष्टच सांगितले..

सक्त वसुली संचालनालयाने (ED) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सक्त वसुली संचालनालयाने (ED) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाकरेंचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर (Sridhar Patankar) यांची 6. 45 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यावर शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.

ईडीने श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारले. त्यावेळी आदित्य म्हणाले आपल्याला या प्रकरणाची माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेऊन बोलेन. महाविकास आघाडीला धोका आहे का असा पश्न विचारला असता ते म्हणाले, सरकारला कोणताही धोका नाही.

केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांना योग्यवेळी या कारवायांना उत्तर देण्यात येईल, असा इशारा देऊन शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना अशा कारवायांना कधीच घाबरली नाही. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. लोकशाहीमध्ये बहुमताच्या आकड्याला खूप महत्त्व आहे. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, दरम्यान, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी एका तासापूर्वी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. मुख्यमंत्री आणि कुंभकोणी यांच्यामध्ये जवळपास सव्वातास चर्चा झाली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाष्य केले. पवार म्हणाले, ठाकरेंवरील कारवाईबद्दल माहिती नाही. या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशासमोरील महत्वाचा प्रश्न आहे, असेही पवार म्हणाले. केंद्र सरकारने लोकसभेत ईडीने सात वर्षात केलेल्या कारवाइची माहिती दिली. त्यावर पवार म्हणाले, तुम्ही दिलेली आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छ सांगते याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूने कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. स्पष्ट सांगायचे म्हणजे ५-१० वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती. आता ही ईडी गावागावात गेली. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या चालू आहे. बघुयात आता याला काही पर्याय आहेत. मात्र, त्यावर आता चर्चा न केलेली बरी असेही पवार म्हणाले.

दरम्यान, ईडीने करचुकवेगिरी प्रकरणी पुष्पक बुलियन आणि समूहातील इतर कंपन्यांच्या विरोधात 6 मार्च 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ईडीने आधी महेश पाटील, चंद्रकांत पटेल आणि त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मालकीच्या कंपन्यांची 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुष्पक ग्रुपमधील पैसे महेश पटेल यांनी पुष्पक रिअॅलिटीचे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या सहाय्याने इतर कंपन्यांत वळवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT