Aditya Thackeray  Ayodhya Visit, Shivsena News
Aditya Thackeray Ayodhya Visit, Shivsena News 
मुंबई

आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर; असा असेल दौरा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : रामललांचे दर्शन घेण्यासाठी आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. शिवसेनेचे (Shivsena) सचिव मिलिंद नार्वेकर हे त्यांच्यासोबत या दौऱ्यात असतील. आज सकाळीच विशेष विमानाने दोघेही रवाना होणार आहेत. (Aditya Thackeray Ayodhya Visit)

खरं तर आज अनेक शिवसेना आमदारांना आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्याची इच्छा होती. मात्र २० तारखेची विधानपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने या उत्साहाला आवर घालणे भाग पडले आहे. अयोध्या दौऱ्याचे मुख्य आयोजक खासदार संजय राऊत तयारीसाठी तेथे आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. आज आदित्य ठाकरे अयोध्येतील बहुतांश महत्वाच्या स्थळांना भेटी देणार आहेत.

प्रसिध्द हनुमानगढीचे दर्शन घेत आदित्य ठाकरे दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. घेतील.त्यानंतर प्रस्तावित राममंदिराचे प्रभूंच्या जन्मस्थळी दर्शन घेतल्यानंतर ते लक्ष्मण किल्ल्यावाही भेट देणार आहेत. ही भेट केवळ प्रतिकात्मक न रहाता ती सर्वार्थाने महत्वाची अयोध्यावारी ठरावी यासाठी सर्वतोपरीने काळजी घेण्यात येत आहे. शरयूनदीवरील नयाघाट येथे होणाऱ्या दीप आरतीतही उपस्थित सेनानेते सहभागी होतील.आदित्य यांच्या हातून ही आरती केली जाईल.

सकाळीच विशेष विमानाने आदित्य रवाना होणार आहेत.लखनौ ते अयोध्या या मार्गावर काही ठिकाणी त्यांचे स्वागत होण्याची शक्यता आहे. दुपारी आदित्य ठाकरे पत्रपरिषदेलाही संबोधित करतील. शिवसेनेला राष्ट्रीय स्तरावर आणण्याच्या योजनेत या पत्रपरिषदेला अर्थातच महत्व आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रत्येक दौऱ्यात सावलीसारखे राहणारे मिलिंद नार्वेकर यांनीच या प्रतिकात्मक पण महत्वाच्या दौऱ्यात आदित्य समवेत जाण्याची पक्षात चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सचिव विनोद ठाकूरही दौऱ्यात त्यांच्यासोबत असतील.

असा असेल आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

- सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचं लखनौ विमानतळावर आगमन
-दुपारी 1.30 वाजता अयोध्येत आगमन. इस्कॉन मंदिराला भेट देणार
-दुपारी 2.30 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद
-दुपारी 4.30 वाजता- हनुमान गढी येथे दर्शन घेणार
- संध्याकाळी 5 वाजता- प्रभू श्री रामाचं दर्शन
-संध्याकाळी 6 वाजता- लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार
-संध्याकाळी 6.45 वाजता- शरयू नदीच्या घाटावर आरती
-संध्याकाळी 7.30 वाजता- लखनऊला प्रस्थान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT