Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
Shivsena Leader Aditya Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरेंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग; मुंबईतील शाखाप्रमुखांना महत्त्वाचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray : मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील (Mumbai) विभागवार शाखांचा आढावा आजपासून घ्यायला सुरुवात केली. आज पहिल्या दिवशी भायखळा, वरळी आणि प्रभादेवी मधील काही शाखांमध्ये भेटी देऊन शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि पदाधिकार्यांच्या भेटी घेऊन आदित्य ठाकरे यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शाखांमधल्या कामकाजाचा आढावा घेतला. मुंबईतील इतरही शाखांमध्ये आदित्य भेटी देणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना 'आपण केलेली कामे मतदारांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवा. केलेल्या कामाची माहिती द्या. नवीन मतदार यादीत मतदार राजाची नोंद वाढवा. "तसेच हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार पडणार. त्यामुळे आपण केलेल्या कामाची पोचपावती घरा घरापर्यंत पोहोचवा आणि मतदार राजाला जागृत करा असे देखील आदित्य यांनी सांगितले.

तसेच 'हे सरकार निवडणुकीला घाबरतय, ज्या नगर विकास मंत्र्यांनी नवीन वार्ड रचना जाहीर केली होती, त्याच नगरविकास मंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती वार्ड रचना रद्द केली. त्यामुळे हे सरकार निवडणुकिला घाबरले आहे. शिवसंवाद यात्रेचा पुढचा टप्पा काही दिवसात सुरु होईल. हिंमत असेल तर निवडणुका घ्या आम्ही तयार आहोत. न्याय देवतेवर विश्वास आहे. मंत्रिमंडळ बेकायदेशीर आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे.

शेतकऱ्यांना अजून प्रोत्साहान मदत मिळाली नाही आहे. ५० हजारातील एक रुपयाही अजून कोणाला दिला नाही. आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा आरे जंगल घोषित केले यांनी पुन्हा लाॅकडाऊन सारखे तिथे काम केले. कदाचित या लोकांचा तिथे कमर्शियल इंटरेस्ट असेल म्हणून या सरकाचा यामध्ये अधिक इंटरेस्ट आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT