Aditya Thackeray, Tejashwi Yadav
Aditya Thackeray, Tejashwi Yadav Sarkarnama
मुंबई

राज्यातील यात्रेनंतर आदित्य ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय; तेजस्वी यादवांची भेट अन्

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray, Tejashwi Yadav News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आता राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार असल्याचे संकेत आहेत. आदित्य बिहारचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे (२३ नोव्हेंबर) उद्या बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. पटना येथे तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची (BJP) साथ सोडत राष्ट्रीय जनता दलासोबत महाआघाडी तयार करत सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकट्या तेजस्वी यादव यांनी भाजप आणि जेडीयू युतीच्या नाकी नऊ आणले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर ठाकरे भाजपच्या विरोधात ठामपणे भूमिका घेत आहेत.

रविवारच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊन भाजप विरोधात लढणार असल्याचे जाहीर केले आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव लढत आहेत. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर भाजपच्या विरोधात ठाकरे यांनी राण उठवले आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधकांना एकत्र करण्यासाठी ठाकरे पुढाकार घेऊ शकतात. त्यामुळे तेजस्वी यादव यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांचे युवा नेते आहेत. त्यांची भेट होणार असल्यामुळे राजकीय वर्तुळाते या भेटीकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होत आदित्य यांनी राष्ट्रीय राजकारणाचे संकेत दिले आहेत. तेजस्वी यादव यांच्या भेटीमुळे याला बळकटी मिळणार आहे.

देशात भाजप विरोधी आघाडीची मोट बाधण्यासाठी आदित्य आणि तेजस्वी यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. या भेटीच्या माध्यमातून आता ठाकरेंनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर भाजप विरोधी लढ्यात ठाकरे आग्रहीपणे उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात येत्या काळात आदित्य ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT