Aditya Thackeray-Sushant Singh Case Sarkarnama
मुंबई

Sushant Singh Rajput Case : आधी आमचे ऐकून घ्या, सुशांत सिंगप्रकरणी आदित्य ठाकरेंची हायकोर्टात धाव!

Aditya Thackeray-Sushant Singh Rajput Case : 'आदित्य ठाकरेंना ताब्यात घ्या, याचिकेत आग्रही मागणी, 20 ऑक्टोबरला सुनावणी...

Chetan Zadpe

Sushant Singh Rajput Death Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग रजपूत आणि दिशा सालियान यांच्या प्रकरणामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राशीद खान पठाण यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली. यामध्ये आदित्य यांना ताब्यात घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर आता आदित्य ठाकरे यांनी या याचिकेविरोधात कॅव्हेट दाखल केले आहे. याप्रकरणी २० ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय मंत्री/खासदारांचा गंभीर आरोप

दिशा सालीयान (Disha Salian) मृत्यूप्रकरणी मागील काळात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळजनक आरोप लावले होते. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते.

आधी आमची बाजू ऐकून घ्या

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घेतली जावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी याचिकेद्वारे (कॅव्हेट) केली आहे. या प्रकरणी आधीच सीबीआयकडून तपास सुरू असताना पुन्हा एकदा त्यासंदर्भात याचिका दाखल करणे अयोग्य असून, या याचिकेवर सुनावणी घेतली जाऊ नये, अशी विनंती आदित्य ठाकरे यांचे वकील राहुल अरोटे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात तातडीने अटक करून त्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकाकर्ते राशीद खान पठाण यांनी आपल्या याचिकेद्वारे केली. दरम्यान, या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. सप्टेंबरमध्येच ही याचिका उच्च न्यायालयापुढे सुनावणीसाठी दाखल करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे उपस्थित असल्याचा राणेंचा दावा

'दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांची हत्याच झाली आहे, या माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. या दोघांची आत्महत्या नसून ही प्रत्यक्षात हत्या आहेत. सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या हत्येमध्ये आदित्य ठाकरे आरोपी आहेत, आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते, असं मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं,' असा अतिशय गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT