Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
Shivsena Leader Aditya Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरेंचे ठरले; भरत गोगावले अन् दळवींच्या मतदार संघात धडकणार

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray : मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्यामध्ये ते रायगड जिल्ह्यातील मतदार संघाचा दौरा करणार आहेत. या तिसऱ्या टप्प्यात रायगड जिल्ह्यात दोन ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

आदित्य ठाकरे यांचा दौरा १७ जुलै २०२२ रोजी १ दिवसाचाच असणार आहे. दौऱ्या दरम्यान अलिबाग आणि महाड येथे 'शिव संवाद' यात्रा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे या आमदारांच्या मतदार संघांचा दौरा करुन आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.

आता त्यांचा हा दौरा रायगड जिल्ह्यातील दोन मतदार संघात असणार आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawle) यांच्या मतदार संघात आदित्य ठाकरे धडकणार आहेत. तर याच दौऱ्यात दुसरी सभा ही अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या मतदार संघात होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला गोगावले आणि दळवी यांच्या मतदार संघात कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणे महत्त्वाचे ठकरणार आहे.

आदित्य यांनी या आधी दोन 'शिव संवाद' यात्रा काढल्या आहेत. त्या दोन्ही यात्रांमध्ये त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. या यात्रांमध्ये शिवसैनिकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन त्यांना मिळाले आहे. पुण्यात झालेल्या आदित्य यांच्या मेळाव्यानंतर उद्याग मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यानंतर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देताना जशास तसे उत्तर देण्यात येईल असे म्हणटले होते. आता भरत गोगावले यांच्या मतदार संघातच आदित्य यांचा दौरा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT