Aditya Thackeray News :
Aditya Thackeray News :  Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray News : मुंबईचा कायापालट करण्यासाठी सरसवलेल्या कोणत्या कंपन्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबईतील विकासकामांवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, "जानेवारीमध्ये टेंडर निघाले. तेव्हा सांगण्यात आलं की 900 रस्ते, म्हणजे 400 किलोमीटरचे रस्ते मुंबईत काँक्रीटचे होतील. या सर्व रस्त्यापैकी दहा रस्तेही झाले नाहीत. याबाबत आम्ही प्रशासकाला पत्र दिले. पण याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही, असा हल्लाबेल आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबईत खडीचा मोठा घोटाळा झाला आहे, तो मी आपल्या सर्वांच्या समोर आणला. असं म्हटलं जातं की, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे कोणीतरी या संपूर्ण रॅकेटमध्ये आहेत", असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

दरम्यान, एनसीसी लिमिटेड या कंपनीने झोन ३ (पश्चिम उपनगरे) मध्ये कामे करण्यासाठी निविदा भरली होती, त्यांनी अधिकृत अंदाजापेक्षा 4.5% जास्त मूल्य जास्त केले होते. झोनमधील कामांसाठी अंदाजे प्रकल्प खर्च 1,223 कोटी रुपये होता. तथापि, कंपनीने बीएमसीला पत्र लिहून सांगितले की ते काम वेळेत करू शकत नाही.

कोणत्या कंपन्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा?

दोन वर्षांचे रोड कॉंक्रिटिंग मेगा-कॉन्ट्रॅक्ट नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी, ईगल इन्फ्रा इंडीया, रोडवेज सॉल्युशन इंडिया, मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि दिनेशचंद्र अग्रवाल इन्फ्राकॉन यांना दिले जाणे शक्यता होती. या पैकी काही कंपन्यांनी कामे केले आहेत, किंवा काहींची कामे सुरू आहेत.

मार्चमध्ये आणखी 375 किमी काँक्रिटीकरणाची निविदा काढले होते. "सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांसाठी ही शेवटची निविदा होती. यामुळे आदित्यांचा निशाणा नेमका कोणाकडे याबद्दल चर्चा होत आहे.

आदित्य ठाकरेंनी याआधीही आरोप केले होते. "मुंबईतील बहुतेक रस्त्यांची आणि पुलांची कामे 2 आठवड्यांहून अधिक काळ नियमित पुरवठादारांकडून खडी पुरवठ्याच्या अभावामुळे अक्षरशः बंद आहेत. मुख्यमंत्री विशिष्ट कंपनीद्वारे पुरवठा करण्यासाठी दबाव आणला आहे, म्हणूनच आता खर्च 50% पेक्षा जास्त झाला आहे, ज्यामुळे रस्ता/पुलाच्या खर्चात वाढ होईल, असा आरोप ठाकरेंनी केला होता.

डेलिसल रोड ब्रिज आणि बीएमसीने हाती घेतलेली इतर रस्त्यांची कामे, यासारखी महत्त्वाची कामे 31 मेच्या मुदतीपर्यंत पूर्ण होणार नाहीत. भ्रष्ट प्रशासन आणि सरकारच्या कामगिरीमुळे मुंबईकरांना याचा फटका बसत आहे, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT