Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray News : नोव्हेंबरमध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल; त्यानंतर... आदित्य ठाकरेंचा महायुतीला इशारा

Political News : राज्य सरकारचे बजेट हे गाजर बजेट होत. त्यात काही मिळालं नाही. केंद्राचे बजेट भोपळा बजेट आहे. त्यात काही मिळाले नाही. काही मिळालं नसताना एवढा खर्च कशासाठी? करण्यात आले असल्याचा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : गेल्या दीड-दोन वर्षांत महाराष्ट्राची लूट सुरू आहे. 15 जानेवारी 2023 रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी रस्ते घोटाळासमोर आला होता. मी दावा नाही तर पूर्ण माहिती घेऊन सांगतोय की कोणतेच काम झालेले नाही. कंत्राटदार मित्रांना आवडलं नाही म्हणून कंत्राट रद्द करण्यात आले असल्याचा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यात यामध्ये कंत्राटदार कोण होते? अधिकारी कोण होते? या सगळ्यांची चौकशी आम्ही करू आणि पारदर्शकपणे चौकशी करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. (Aditya Thackeray News)

दक्षिण मुंबईतील एक कंत्राटदार आहे, त्याने काम थांबवले आहे. त्याने काम थांबवलं की थांबवायला सांगितले, याबाबत काहीच उत्तर आलेले नाही. परत एकदा 6 हजार कोटींची कंत्राट आणले आहे. पुन्हा एकदा पाच कंत्राटदार मित्रांना हे दिले जाणार आहे. मागे जे कंत्राट काढण्यात आले. त्यात किती काम झाले हे सांगा, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

किती जणांना ब्लॅक लिस्ट करण्यात आले?

राज्य सरकारचे बजेट हे गाजर बजेट होत. त्यात काही मिळालं नाही. केंद्राचे बजेट भोपळा बजेट आहे. त्यात काही मिळाले नाही. काही मिळालं नसताना एवढा खर्च कशासाठी? NHAI चा गोंधळ सुरू आहे. मुंबई पोलीस रस्ता भरत आहेत. कंत्राटदार कुठे दिसत नाहीत. याबाबतचा फोटो माध्यमांमधून समोर आला आहे.

रस्त्यावरील एकही खड्डा भरण्यात आलेला नाही. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हेलिकॉप्टरने पाहणी करावी. गेल्या दीड दोन वर्षात जी लूट सुरु आहे, ते आपण पाहत आलोय. 15 जानेवारी 2023 ला मी पत्रकार परिषद घेतली आणि रोड स्कॅम समोर आणला होता. आता जुलै 2024आहे, अजूनही काम झालेले नाही. यात दक्षिण मुंबईतील कंत्राटदार याने काम केले नाही म्हणून त्याला काढलं की ब्लॅक लिस्ट केलं? दंड लावला तो वसूल केला का? हा प्रश्न समोर येत असल्याचे समोर येत असल्याचे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

नोव्हेंबरमध्ये आमच सरकार आल्यावर आम्ही या कॉन्ट्रॅक्टरचा स्टॉप पेमेंट करणार आहोत, हे काम थांबवणार आहोत. त्यावेळी जो कोणी हा घोटाळा करत आहे. NHAI आता नवीन ऑफर आणेल. कोणत्याही हायवेवर जा आणि फोटो काढा. तुम्हाला लेपाची बॉटल फ्री अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबईतील रस्त्याच्या काँक्रिटकरणाचे काम किती झाले? हे आम्हाला महापलिकेने सांगावे. सगळीकडे खड्डे पाहायला मिळाले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांच्या मित्राला कंत्राट द्यायचे आहे, म्हणून आपण हे सोसायचा का ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

सरकार आल्यानंतर पारदर्शकपणे चौकशी करणार

NHAI यांच्याकडून सुद्धा काही काम होत नाहीत. नुसता पॉडकास्टमध्ये सांगतात, एवढ्या मिनिटात एवढे रस्ते बनवले पण सगळीकडे रस्त्यावर खड्डे आहेत. नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यात यामध्ये कंत्राटदार कोण होते? अधिकारी कोण होते? या सगळ्यांची चौकशी आम्ही करू आणि पारदर्शकपणे चौकशी करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT