Tukaram Munde
Tukaram Munde Sarkarnama
मुंबई

Tukaram Munde : डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार शिर्डी साई संस्थानचा कारभार

सरकारनामा ब्यूरो

Tukaram Munde News : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या (Sai Baba Trust) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat) यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळामध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस (Fadnavis) सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र आज तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे (Tukaram Munde) आता शिर्डीत (Shirdi) येणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. तर अनेकांनी त्यांच्या शिर्डीतील नियुक्तीचा आनंद व्यक्त केलाय.

दरम्यान, आरोग्य संस्थांना अचानक भेटी, मुख्यालयी न राहणाऱ्यांना वेतन कपात व घरभाडे कपातीच्या नोटीसा, २४ तास ड्युटी करा, इंटर्नशिप करणाऱ्यांनीही ड्युटी करावी लागेल, अशी नियमानुसार शिस्त घालण्याचा प्रयत्न, तुकाराम मुंढे यांनी आरोग्य अभियान आयुक्त असताना केला. त्यामुळे तुकाराम मुंढेंना सुरुवातीपासूनच डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा विरोध असल्याचं दिसून आलं. मात्र आता मुंढेंची बदली झाल्याने डॉक्टरांच्या मागील झंजट संपली आहे.

१६ वर्षांत २० पेक्षा जास्त वेळा बदली?

गेल्या १६ वर्षांच्या सेवेत तुकाराम मुंढे यांची २० पेक्षा जास्त वेळा बदली (Transfer) झाली आहे. तुकाराम मुंढे हे २००५ सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांची धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख आहे. आता त्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाच्या जबाबदारीवरून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT