Advay Hire
Advay Hire  Sarkarnama
मुंबई

Advay Hiray News: अद्वय हिरे यांची उद्धव ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती

सरकारनामा ब्युरो

Mumbai News: भाजपचा राजीनामा देऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात सहभागी झालेल्या डॉ. अद्वय हिरे यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. पक्षाचे सचिव खासदार संजय राऊत यांनी याबाबत टि्वट करीत ही माहिती दिली आहे.

मुंबई येथे काल (गुरुवारी) खासदार विनायक राऊत यांनी उपनेतेपदी हिरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.

माजीमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्करराव जाधव, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहनेते सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, सुरेश पवार, पवन ठाकरे आदी उपस्थित होते.

मालेगाव येथे रविवारी (ता.२६ मार्च)म.स.गा. महाविद्यालयाच्या प्रांगणावर विराट महासभा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवगर्जनेने होणार आहे, या सभेस सेना नेते प्रमुख नेत्यांसह ठाकरे गटाचे महाराष्ट्रातील मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.

सभेस खासदार संजय राऊत, महिला नेत्या सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री देसाई, विरोधी पक्षनेते दानवे, आमदार जाधव आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT