Ajit pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar NCP: अजित पवारांच्या आमदारांचा बैठकीत महत्वाचा निर्णय; आठवडाभरानंतर पुन्हा...

Ajit Pawar NCP MLAs Meeting: लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव पदरी पडल्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत एक बैठक पार पडली.

Jagdish Patil

Ajit Pawar NCP MLAs Meeting: लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव पदरी पडल्यानंतर अजित पवार गटा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आठवडाभरानंतर अजित पवार गट पुढचं धोरण ठरवणार असल्याची असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मुंबईतील बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) गट आठवडाभरानंतर आपलं पुढचं धोरण ठरवणार आहे. सध्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने का नाकारले, याबाबतचं चिंतन आम्ही करत आहोत. आठवडाभर चिंतन केल्यावर आमची पुन्हा एक बैठक होईल. त्या बैठकीत पराभवाची कारणं मांडलं जातील. त्यानंतर अजित पवार गट पुढचं धोरण जाहीर करेल, असं वळसे पाटलांनी सांगितलं.

त्यामुळं पुढच्या आठवड्यात अजित पवारांची राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यात महायुतीला फक्त कांदा प्रश्नामुळं फटका बसला नाही, त्यासोबत जाती-पातीचं राजकारण, संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार ही कारणीभूत ठरल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.

तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेकडून पराभूत झाल्यानंतर शिवाजी आढळराव-पाटील पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पराभवामागची नेमकी कारणं काय? तसेच खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आंबेगावची राष्ट्रवादी एकवटली होती. यावेळी विरोधी उमेदवारांनी अपप्रचार केल्यानं पराभव झाल्याचा दावा आढळरावांनी यावेळी केला.

अजितदादांना सोडणार नाही

दरम्यान, विधानसभेला पराभव झाला तरीही अजितदादांची साथ सोडणार नाही, अशी शपथ सर्व आमदारांनी घेतल्याची माहिती अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यामुळे एकीकडे अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. हा रोहित पवारांचा दावा खोडून काढण्यासाठी अजित पवार गटाने दादांची साथ सोडणार नसल्याचा निर्धार केल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT