Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: तुमचं घर फुटलं असं वाटतं का? या प्रश्नावर शरद पवारांनी दिलं थेट उत्तर...

सरकारनामा ब्यूरो

NCP News: विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अजून काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे.

यावेळी शरद पवार यांना माध्यामांच्या प्रतिनिधींनी तुमचं घर फुटलं असं वाटतं का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले, "आमचं घर फुटलं असं मला वाटत नाही. हा प्रश्न घर फुटण्याचा नाही तर प्रश्न जनतेचा आहे. तो घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. काही अडचणी असतील तर ते चर्चेतून सोडवू. सध्या अनेक लोकं मला संपर्क साधत आहेत ", असं शरद पवार म्हणाले.

"पक्ष फुटला याची मला चिंता नाही. मात्र, जे सहकारी तिकडे गेले आहेत त्यांचे पुढे भवितव्य काय आहे?", असा प्रश्न उपस्थित करत "याआधीही तब्बलल 56 पैकी 50 आमदार गेले होते. तरी आम्ही उभा राहिलो आणि यापुढेही राहू", असंही यावेळी शरद पवार यावेळी म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचा यापुढे आश्वासक चेहरा कोण असेल? असाही प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळ्यात आश्वासक चेहरा शरद पवार", अशी तेट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

"याबरोबरच महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे. आतापर्यंत मी अनेक निवडणुका लढवल्या. त्या निवडणुकीत लोकांनी मला निवडून दिलं. त्यामुळे आता जनतेचा माझ्यावर विश्वास आहे", असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT